
सहसंपादक : रामभाऊ भोयर
कळंब :- 17 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा अंतरगाव येथे शिक्षण परिषद घेण्यात आली.यावेळी सर्वप्रथम शिक्षणाचे आराध्य दैवत माता सावित्री यांचे प्रतिमेचे उपस्थित सर्व मान्यवरांचे हस्ते पुजन करण्यात आले.त्यानंतर पुष्पगुच्छ देवून सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक आदरणीय डंभारे सर केंद्रप्रमुख यांनी केले.ते बोलतांना म्हणाले कि याशाळेत शिक्षण परिषद घेण्याचा ऊद्देश म्हणजे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा अंतरगाव या शाळेमध्ये राबवित असलेले विविध ऊपक्रम व यावर्षी विद्यार्थ्यांनी तालूका व जिल्हास्तरावर मिळविलेले बक्षिस त्यानिमीत्ताने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच मागील वर्षी या शाळेला “माझी शाळा सुंदर शाळा” या उपक्रमामध्ये तालुक्यातून मिळालेला प्रथम क्रमांक ,या सर्व विविध उपक्रमाची शिक्षकांना माहिती व्हावी या हेतूने शिक्षण परिषद घेण्यात आली.
शिक्षण परिषदेला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. प्रदीपभाऊ सहस्त्रबुद्धे ,उपसरपंच श्री. गौरव मडावी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य बंडूजी खारकर तसेच शाळेला लाखोंची जमीन क्रिडांगणा करीता दान देणाऱ्या देणगीदात्या रोशन ताई कोठडीया, पंचायत समिती कळंब येथील शिक्षण विस्तार अधिकारी सौ. वैशाली चिरडे मॅडम ,डोंगरखर्डा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. ज्ञानेश्वर डंभारे सर , मेटीखेडा केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय श्री. दरणे सर तसेच परसोडी शाळेचे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त व उपक्रमशील शिक्षक संदीप कोल्हे सर मार्गदर्शक म्हणून हजर होते. शाळेला वेळोवेळी मदत करणारे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपसरपंच व रोशनताई कोठडीया , सुमयाताई पठाण, पपीता पवार यांचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. जिल्हास्तरीय सांस्कृतिक क्रीडा महोत्सवामध्ये जिल्हा परिषद शाळा अंतरगाव यांचा सामूहिक नृत्याचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल विद्यार्थ्यांना शालेय दप्तर मिळाले होते, त्या शालेय दप्तरांचे वितरण सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. केंद्रप्रमुख श्री डंभारे सर यांनी ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारच्या कामांचा आढावा घेतला व त्यानंतर सुलभक श्री संदीप कोल्हे सर यांनी मराठी व गणित विषयाच्या अध्यापन पद्धती व विविध उपक्रमाबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले त्यानंतर सर्व शिक्षकांनी रुचकर जेवणाचा आस्वाद घेतला. अंतरगाव शाळेमध्ये केलेले फलक लेखन ,वर्ग सजावट ,परसबाग ,विविध विषयाच्या प्रयोगशाळा ,कल्पक पद्धतीने केलेले वृक्षारोपण ,फुलांची बाग व उत्तम नियोजन या सर्वांचे उपस्थित सर्व शिक्षकांनी भरभरून कौतुक केले. शिक्षण परिषदेच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष ,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य ,सरपंच ,उपसरपंच ,बद्रुद्दीन कोठडीया ,रोशनताई कोठडीया ,शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय खोंडे सर, शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती नयना खडसे मॅडम, श्रीमती मुंडली मॅडम व श्रीमती अंबुरे मॅडम
श्रीमती प्रमिलाबाई कोकांडे , श्रीमती वंदनाबाई सलाम यांनी हातभार लावला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती वर्षा लोणारे व आभार प्रदर्शन श्रीमती जीवन अंबुरे यांनी केले.
