
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या तरतुदीनुसार शासकीय जमिनीवरील १ जानेवारी २०११ पर्यंतची सर्व निवासी अतिक्रमणे नियमित करणे बाबत शासनाने निर्णय घेतला असून आता सर्व अतिक्रमणधारकांना त्यांचे हक्काचे घर नावे होणार आहेत या संदर्भात शासनाचा आदेश निर्गमित झाला आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी दिली आहे .
राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील शासकीय जमिनीवर तसेच गायरान जमिनीवर मोठ्या प्रमाणात निवासी हेतूने अतिक्रमणे झाली आहेत केंद्र व राज्य शासनाने याबाबत “सर्वांसाठीघरे” हे धोरण विचारात घेऊन निवासी अतिक्रमणे विशिष्ट अटी व शर्तीच्या अधीन राहून नियमित करण्याबाबत शासनाने निर्णय धोरण जाहीर केले आहे
यात एक जानेवारी 2011 रोजी निवासी अतिक्रमणे विचारात घेतली जाणार आहे पुराव्यासाठी मतदार यादीत नाव विद्युत बिल मालमत्ता कर दंडाची पावती किंवा त्या जागेचे शासकीय दस्तऐवज हा पुरावा ग्राह्य धरला जाणार आहे तसेच ग्राम पंचायत मधील आठ अ उतारा अतिक्रमण सर्वेक्षण नोंदवही झोपडपट्टी घोषणेची अधिसूचना या बाबी ग्राह्य धरल्या जातील
याकरिता जागेची मर्यादा व शुल्क शासनाने निर्धारित केले आहे ग्रामीण व शहरी भागासाठी 500 चौरस फूट क्षेत्रापर्यंत सर्व निवासी अतिक्रमणे विनामूल्य नियमानुकल करण्यात येतील 500 चौरस फुटा वरील क्षेत्रासाठी प्रचलित वार्षिक दर विवरणानुसार येणारे बाजार मूल्यानुसार येणाऱ्या किमतीच्या दहा टक्के रक्कम तर निवासी जागेचा काही भाग व्यावसायिक असल्यास प्रचलित बाजार मूल्यापेक्षा 25% रक्कम आकारली जाईल
अंमलबजावणीची कार्यपद्धती ही अटी व शर्तीची पूर्तता होत असलेली व्यक्ती नियमानुसार पात्र होतील अशा व्यक्तींनी अतिक्रमण नियमानुकल करण्यासाठी अर्ज 31 डिसेंबर 2026 पर्यंत करावेत अशी माहिती पत्रकार परिषदेत राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी दिली आहे. या व्यतिरिक्त नगर पंचायत राळेगांव ची अमृत पाणीपुरवठा योजनेची एजन्सी मजिप्रा कडे वळती केली असून, नगर पंचायत राळेगांव ची आमसभा घेण्यात येईल, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तिनशे एकसष्ट बी वरील बंद पथदिव्यांची जवाबदारी नपंरा ची असल्याचे प्रतिपादन केले आहे..
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष ऍड प्रफुल्लसिंह चौव्हान चित्तरंजन कोल्हे भाजपा तालुका अध्यक्ष छाया पिंपरे डॉ कुणाल भोयर शहराध्यक्ष शुभम मुके प्रवीण कोकाटे प्रशांत तायडे यांची उपस्थिती होती…
