
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
विद्यार्थ्यांमध्ये थोर व्यक्तींच्या कार्याची ओळख निर्माण व्हावी आणि त्यांच्यापासून प्रेरणा मिळावी या उद्देशाने मेटीखेडा येथील सामाजिक कार्यकर्ते विशाल सरोदे यांनी एक स्तुत्य उपक्रम राबविला. तसेच कनिष्ठ प्राथमिक मराठी शाळा मार्कडा येथे पाचवीच्या व चौथी, तिसरा वर्गात विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले
यांच्या जीवनावरील माहितीपूर्ण पुस्तके भेट दिली.
या पुस्तक वितरण कार्यक्रमात
विशाल सरोदे,गावातील प्रतिटिस्ट नागरिक यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यात आली. यावेळी
तसेच कनिष्ठ प्राथमिक शाळा मार्कडा शाळेचे मुख्याध्यापिका वैशाली उईके (मंगाम )शीतल चौधरी कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या उपक्रमाबद्दल शिक्षक, पालक व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. अशा उपक्रमांची गरज असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले.
