
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
दिनांक 09/042026 रोज गुरुवारला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्त्याची सुरुवात करण्यात आली त्यानिमित्ताने आज महाड चवदार सत्याग्रह व मानवी हक्काचे महत्व या विषयावर वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा घेण्यात आली. वैभव नथुजी वडदे, कुमारी नीलम विठ्ठल वडदे ,प्रियंका कृष्णाराव ऋषिका वाठोडे ,वैष्णवी बंडू गेडाम या विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच संत गाडगे महाराज यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त संत गाडगे महाराज यांच्या कार्याचे महत्त्व याबद्दल श्री खोले सर यांनी व्याख्यान दिले … या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राथमिक मुख्याध्यापिका कुमारी मानकर मॅडम व प्रमुख पाहुणे म्हणून श्री झलके सर व सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते
