वाळकेवाडी येथे जागतिक मृदा दीना निमित्त “राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत जमीन आरोग्य पत्रिका वाटप….


प्रतिनिधी …परमेश्वर सुर्यवंशी

लोकहीत महाराष्ट्र हिमायतनगर ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली क्लीक करा.

https://chat.whatsapp.com/CFgCAntEMgvDGLxMLkhGU1

हिमायतनगर तालुक्यातील कृषी दत्तक असलेल्या वाळकेवाडी गावामध्ये जागतिक मृदा दीना निमित्त माती प्रशिक्षणाचे फायदे या विषयावर कृषी सहाय्यक ढगे मॅडम यांनी सखोल असे मार्गदर्शक केले…
माती प्रशिक्षनाचे फायदे सर्व शेतकरी मंडळीला सोप्या भाषेमध्ये समजून सांगितले त्या
मध्ये… शेतकऱ्यांना मातीचे आरोग्य सांभाळावे व माती-पाणी परिक्षण करुन घेणे काळाजी गरज असून शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीचा अवलंब करावा, असे प्रतिपादन प्राध्यापक ढगे सर यांनी केले.
शेतकऱ्यांना माती परिक्षणासाठी नमुना कसा घ्यावा व तयार झालेल्या आरोग्य पत्रिकाप्रमाणे अन्नद्रव्यांचा संतुलित वापर कसा करावा याविषयी माहिती स्थानिक कृषी सहाय्यक ढगे मॅडम यांनी सांगितली व सर्व शेतकरी मंडळीला राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान जमीन आरोग्य पत्रिका वाटप करण्यात आल्या…
यावेळी उपस्थित, प्रमुख मार्गदर्शक ढगे सर,कृषी सहाय्यक ढगे मॅडम, सरपंच देवराव डवरे,उप सरपंच दीपक वाळके, पोलीस पाटील सूर्यवंशी, नितीन तांबारे आदी ग्रामस्थ होते….