
हिमायतनगर प्रतिनिधी
नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 चे आरक्षण सोडत जाहीर झाल्या नंतर सर्वांचे लक्ष लागलेल्या वार्ड क्र 10ची कॉंग्रेस पक्षाची उमेदवारी शहरातील व वार्डातील रहिवाशी व माजी खासदार सुभाष वानखेडे यांचे कट्टर समर्थक स्व.विजयराव नरवाडे यांचे चिरंजीव विकास नरवाडे व माजी खासदार सुभाष वानखेडेआमदार यांचे अत्यंत विश्वासू निष्ठावंत कार्यकर्ते विकास नरवाडे यांनाच ही उमेदवारी देण्यात यावी यासाठी शहरातील नागरिकांची मागणी आहे
हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीचे आरक्षण सोडत झाल्यानंतर शहरात जागो जागी हॉटेल मंदिर परिसरात निवडणुकीचे वारे चांगलेच वाहू लागले आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाने शहरातील सर्व वार्डातील इच्छुक उमेदवारांचे अर्ज तालुका अध्यक्ष विकास पाटील देवसरकर व शहर अध्यक्ष संजय माने यांनी काँग्रेस संपर्क कार्यालयात सर्व इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आले होते त्यामध्ये वार्ड क्रमांक 10 मधून माजी खासदार सुभाष वानखेडे यांचेअत्यंत विश्वासू कार्यकर्ते विकास नरवाडे यांनी हा अर्ज भरला त्यामुळे वार्ड क्रमांक 10मधून पक्षाचे काम करणारे व वेळोवेळी जनतेच्या अडीअडचणी सोडणारे समाजामध्ये अग्रेसर असणारे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते यांना ही उमेदवारी मिळेल का ? ह्या कडे मात्र सर्व जनतेचे लक्ष लागले आहे सुभाष वानखेडे यांनी विकास नरवाडे यांना टिकिट दिल्यास स्व विजय नरवाडे कार्यास फळ मिळाले अशी चर्चा सुरू आहे
