
प्रतिनिधी:सुमित शर्मा,नाशिक
नाशिक/ पंचवटी विभागाअंतर्गत पंचवटी जलशुध्दीकरण केंद्र येथील दुर्गानगर व मखमलाबाद जलकुंभास पाणीपुरवठा करणारी उर्ध्ववाहीनी पंचवटी जलशुध्दीकरण केंद्रालगत लिकेज झाल्याने सदरचे काम तातडीने करणे आवश्यक आहे. सदर उर्ध्ववाहीनीचे दुरुस्ती करणेचे काम गुरुवार दि.11/02/2021 रोजी हाती घेणेत येणार असल्याने दुर्गानगर व मखमलाबाद जलकुंभावरुन होणारा प्रभाग क्र.1 मधील शिवतेज नगर (पै.), श्रीधर कॉलनी (पै), , तसेच प्र.क्र. 6 मधील चांदशी रोड, गंगावाडी रोड, फडोळ मळा, रामकृष्ण नगर, पिंगळे नगर, एरिकेशन कॉलनी, मानकर नगर, महालक्ष्मी नगर, स्वामी विवेकानंद नगर, मानकर मळा, तवली डोंगर परिसर, कल्याणी व राजेय सोसा, मेहेरधाम, गॅसगोडावून, यशोदानगर, पेठरोड, इत्यादी परिसरात गुरुवार दि. 11/02/2021 रोजीचा दुपारचा व सायंकाळचा पाणी पुरवठा होणार नाही व प्रभाग क्र.1 मधील दुर्गा नगर, शिव समर्थ नगर, जुई नगर, ओंकार बंगला परिसर शिवतेज नगर (पै.), श्रीधर कॉलनी (पै.) व प्र क्र 4 मधील कॅन्सर हॉस्पीटल मागिल परिसर, अनुसयानगर, कर्णनगर, समर्थनगर व हमालवाडी परिसर, पवार मळा परिसर तसेच प्र.क्र.6 मधील मखमलाबाद गांव, मखमलाबाद रोउ पश्चिम भाग, मातोश्री नगर, विद्या नगर, वडजाई माता नगर, महादेव कॉलनी, कोळी वाडा, घाडगे नगर, एरिकेशन कॉलनी (पै.), मानकर नगर (पै.), जयमल्हार कॉलनी, अश्वमेघ नगर, सप्तरंग सोसा. इत्यादी परिसरात शुक्रवार दि. 12/02/2021 रोजीचा सकाळचा पाणीपुरवठा होणार नाही याबाबत परिसरातील नागरिकांनी नोंद घेऊन महानगरपालिकेस सहकार्य करावे.
