
प्रतिनिधी ….परमेश्वर सुर्यवंशी
तहसीलदार साहेब,नांदेड (मार्फत) मा. जिल्हाधिकारी साहेब नांदेड
सौ. सीमा स्वामी लोहराळकर, सरचिटणीस (अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती, नांदेड): नांदेड जिल्ह्यासह हिमायत नगर तालुक्यात होत असलेले अवैध धंदे (रेती) यावर येथील प्रशासकीय लोकं आळा घालत नसेल तर त्यांना निलंबीत करावे तसेच राजीनामा घेण्याबाबत
वरील उपरोक्त विषयास अनुसरून आपणास विनंती करण्यात येते की, नांदेड जिल्ह्यातील पिंपळगाव कोरका, राटी थुगांव, कोठी तीर्थ, हसापूर येथील गोदावरी नदीतून होत असलेले अवैध रेती तस्करावर अंकुश घालावे. या क्षेत्रातील संबंधित अधिकारी, पोलीस प्रशासन यांना त्वरित आदेश देऊन क्षेत्रातील अवैध धंदे बंद करावे. या अवैध धंद्यामध्ये काही मातबर कर्मचारी आपले ओले हात करून कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना नाहक हल्ल्याला बळी पडावे लागतात. याचे उदाहरण शेजारील यवतमाळ जिल्ह्यातील नायब तहसीलदार हे मोठे उदाहरण आहे. आज नायब तहसीलदार उद्या आपल्या जिल्ह्यातील कर्तव्य दक्ष कमरचाऱ्यांना तसेच सर्व सामान्यांना अशा हल्ल्या ला बळी पडावे लागेल, यात आत तिळमात्र शंका राहिली नाही. त्यामुळे येथील ही कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना अशा हल्ल्या ला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व बाबींचा आपण विचारता करता, या क्षेत्रातील अवैध रेती बंद करण्यात यावे. व भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करावे तसेच जर हे अधिकारी कार्यवाही करीत नसेल तर संबंधितांचा राजीनामा घेण्यात यावे. अन्यथा लोकशाही मार्गाने संघर्ष करावे लागेल असे, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती, नांदेड द्वारे आपणास कळविण्यात येत आहे. करिता वरील गंभीर प्रश्नाचे समाधान करावे ही विनंती.
