कोरोना संसर्गजन्य विषाणू रोखण्यासाठी करंजी येथे टिका जनजागृती मोहीमेला नागरीकांचा प्रतिसाद

प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी

कोरोना महामारी या प्राणघातक रोगाने सर्वत्र धुमाकूळ घातला असुन दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची म्रुत्यूची आकडेवारी चिंता वाढविणारी आहे.शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या परंतू दिवसेंदिवस कोरोणा रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे, कोरोनापासून नागरीकांच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी सर्वत्र मोफत लसीकरण मोहिम राबविण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून दि. १५एप्रील २०२१रोजी सकाळी १०वाजता हिमायतनगरतालूक्यातील करंजी येथील जिल्हा परिषद शाळेत गावचे सरपंच उपसरपंचयांच्या हस्ते लसीकरणास सुरवात करण्यात आली यावेळी कोरोना महामारीपासून बचाव करण्यासाठी कोरोना लस अत्यंत सुरक्षित असुन लस घेतल्यानंतर त्याचे कुठलेही दुष्परिणाम होत नसून अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण करून घ्यावे तसेच तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांनी आपापल्या कार्यक्षेत्रात लसीकरण मोहिममेची प्रभाविपणे अमलबजावणी करुन गाव कोरोनामुक्त करण्यासाठी अविरतपणे प्रयत्न करावे याकामी कूचराई केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असे सांगितले. आहे असे निर्देश देण्यात आले नागरीकांनी मास्कचा वापर, वारंवार साबनाने हात स्वच्छ धुणे, सनिटायझर, व सूरक्षीत अंतर तसेच कोरोनाची लक्षणे जाणवत असल्यास चाचणी करून घेणे ईत्यादींसह कोरोनाच्या नियम व अटीचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन सरपंच यांनी जनतेला केले आहे.यावेळी उपस्थित आरोग्य सेविका कदम मॅडम आरोग्य अधिकारी कल्याणकर व तसेच राठोड सर अंगणवाडी सेविका गावचे पोलिस ग्रामसेवक मॅडम भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष सरचिटणीस परमेश्वर सुर्यवंशी सह आदि मान्यवर उपस्थित