नाशिक मध्ये लॉकडाऊन ची ऐशी तैशी..,विनाकारण फिरणाऱ्यांची रस्त्यावर गर्दी

प्रतिनिधी:तेजस सोनार,नाशिक

12 मे ते 22 मे दरम्यान कडक लॉकडाउन ची घोषणा पालकमंत्र्यांनी केली होती आणि त्यामुळे 11 मे रोजी अनेक नागरिकांनी पेट्रोल पंप, भाजी बाजार, आणि किराणा दुकाने या ठिकाणी प्रचंड गर्दी केली होती या गोष्टीवर समाजमाध्यमांनी प्रकाशही टाकला परंतु आज लॉक डाऊन चा पहिला दिवस असताना मात्र पुन्हा तेच चित्र पाहायला मिळाले किराणा दुकांनं सकाळी 7 ते 12 या वेळेस फक्त घरपोच सेवेला परवानगी असताना सरसकट दुकाने उघडी असलेले चित्र पाहायला मिळाले तासरच भंगार दुकान अंडी दुकान अशी अनेक दुकाने सरसकट उघडी असल्याचे निदर्शनात आले. नाशिकमध्ये कोरोनाची एवढी भयानक स्थिती असून देखील नागरिकांमध्ये निष्काळजी पणा दिसून येत आहे आता तरी परिस्थितीच गांभीर्य ओळखुन काही दिवस घरात बसावे असे आवाहन लोकप्रतिनिधींकडून केले जात आहे प्रशासनाने देखील आपली भूमिका कडक करून लॉक डाऊन यशस्वी करण्याचा प्रयत्न व्हावा अशी मागणी लोकप्रतिनिधींकडून आणि अनेक सामाजिक कार्यकर्त्यांकडून होताना दिसते आहे.