

सहसंपादक:प्रशांत बदकी
वरोरा शहरात होणाऱ्या अवैध धंद्यामध्ये होणारी आपसी वैरामुळे वाद नेहमीचेच झाले आहे.आज दिनांक 13 /05/2021 रोजी दुपारी 4.30 च्या दरम्यान गांधी चौक येथे फुलांच्या दुकानजवळ निलेश ढोके (19) या युवकाने सुकराम आलांम(पावना) वय 26 वर्ष या युवकाच्या गळ्यावर धारदार चाकूने वर करत खून केल्याची घटना घडली.
सुकराम आलाम हा 26 वर्षीय युवक पावना तालुका:भद्रावती येथील रहिवासी असून तो विवाहित असल्याची माहिती कळते. तो वरोरा शहरातील अंबा देवी वॉर्ड येथे राहत होता .आज सुकराम व निलेश ढोके यांच्यातील वाद विकोपाला जात गळ्यावर धारदार शस्त्राने वार करीत सुकराम चा खुन केला.स्थानिक पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले . भर दिवसा होणाऱ्या या खुनामुळे शहरातील शांतता व सुव्यवस्थेचे वाभाळे निघाले आहे.
