
राळेगांव तालुका प्रतिनिधी :- रामभाऊ भोयर(9529256225)
तालुक्यातील उंदरी येथे ९ ऑगस्ट २०२१ रोज सोमवारला गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या वतीने आदिवासी वीरांगना राणी दुर्गावती, स्वातंत्र्य विर बाबुराव शेडमाके,व जननायक क्रांतीसुर्य बिरसा मंडा यांच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पण व अभिवादन करून जागतिक आदिवासीं दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र गोंडवाना गणतंत्र पार्टीचे कार्याध्यक्ष तिरू.बळवंत मडावी,हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून मोहदा येथील गोंडवाना गणतंत्र पार्टीचे अध्यक्ष तिरु भीमराव पुरके तर प्रमुख पाहुणे म्हणून केळापूर गोंडवाना गणतंत्र पार्टीचे अध्यक्ष अंकुश आत्राम,तर राळेगांव गोंडवाना गणतंत्र पार्टीचे तालुका अध्यक्ष विठ्ठल धुर्वे हे होते. या कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र गोंडवाना गणतंत्र पार्टीचे कार्याध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त केले असून आदिवासी बांधवांनी सत्तेच्या भागीदारीसाठी स्वतंत्र ओळख निर्माण करावी असा संदेश समाज बांधवांना दिला तर भिमराव पूरके, यांनी आदिवासींनी धार्मिक सांस्कृतिक कार्य केले पाहिजे असे मनाेगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गावच्या सरपंच तिरूमाय . निताताई कुळसंगे यांनी केले तर संचालन राजाभाऊ मडावी, यांनी केले . तर आभार प्रदर्शन नितीन मडावी यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता विकास शेडमाके, राहुल वाढवे, मोरेश्वर मरापे,श्याम गेडाम, किसना उईके, विठ्ठल पुसनाके,कुदंन येडमे, सुधाकर कोकांडे,शुभम आत्राम,विशाल तोडासे,सुरज पुरके, सोपान मेश्राम,गणेश कंगाले,नितिन कुळसंगे,अतुल कुळसंगे,रोशन उईके,दिनेश पराते, भालचंद्र उईके,अभय ठाकरे,गावातील आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता .
