शेतकऱ्यांनी पशुपालन करुन आपले उत्पन्न वाढवावे:संजय डांगोरे

(प्रतीनीधी दि.22/03/2022)


निसर्गावर अवलंबुन असनारी शेती,खतआणि मजुरीचे वाढलेले भाव यामुळे शेती परवडत नसल्याची ओरड होते.अशा परिस्थीतीत शेतकर्यांनी शेतीचा जोडधंदा म्हनुन दुधजन्य तथा इतर पशुचे पालन करुन आपली आर्थीक उन्नती करावी असे आवाहन समाजसेवक तथा काटोल पंचायत समीतीचे सदस्य संजयजी डांगोरे यांनी पशुसंवर्धन विभागाने आयोजीत शेतकरी मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी आवाहन केले.
अँस्कँड योजना अंतर्गत पशुसंवर्धन विभाग तर्फे माहीती शिक्षण जनसंपर्क मेळाव्याचे आयोजन पंचायत समीती काटोल तर्फे करण्यात आले . यावेळी कोंबडी पालन,पशुसंवर्धन,आदी विषयावर लाभार्थी तथा शेतकर्यांना मार्गदर्षन करन्यात आले.
यावेळी पस सदस्य निशीकांत नागमोते,माजी जिप सदस्य यादराव आहाके ,डाँ स्वप्नील रेवतकर,डाँ मयुर काटे,डाँ. ब्राम्हनकर प्रमुख उपस्थीती होते.प्रास्ताविक तालुका पशुवैद्यकीय अधीकारी डाँ. त्रुषार पुंड तर संचालन डाँ.अनिल गवळी यांनी केले.