
(प्रतीनीधी) 25/07/2022
. काटोल पंचायत समीती अंतर्गत छोटी 58 तलाव आहे.त्यातील अतीव्रुष्टीने बाधीत तलाव दुरस्तीचा खर्च किंवा रेगुलर मेंन्टनमस खर्चा करीता दरवर्षी निधी देन्याची मागनी काटोल पंचायत समीती सदस्य संजयजी डांगोरे यांनी जिल्हा परिषदेला केलेली आहे. पाझर तलाव,गाव तलाव,लघुसिंचन तलाव,साठवन तलाव आदी तलावाची पाहनी सिईओ यांचे सुचनेनुसार काटोल तालुक्यात सुरु आहे.अतीव्रुष्टीमुळे 58पैकी जवळ पास बहुतेक तलाव याच आठवड्यात 95-100 टक्के भरलेली असुन ,कुठेही अनुचित प्रकार घडु नये याकरीता अधीकारी -पदाधीकारी तलावाची पाहनी करीत आहे.साफसफाई किंवा कुठे डागडुजी सुद्धा करन्यात येत आहे. उंदीर- घुस सारख्या इतर प्रान्यामुळे काही तलावाचे नुकसान झालेल्या बांधाची दुरस्ती आवश्यक असते. मुर्ती,खंडाळा,रिधोरा,मेंढेपठार,लाडगाव,आदी अनेक तलावाची पाहनी करन्यात आली यावेळी पंचायत समीती सदस्य संजयजी डांगोरे,खंडविकास अधीकारी दामोदर बारापात्रे,सहा.बिडीओ संजय पाटील,सिंचन विभागाचे उपअभीयंता टि डी पारधी,लघु सिंचन विभागाचे अंगदअरगंडे,कमलेष बेलसरे आदीची यावेळी उपस्थीती होती.
