

युवतींनी देशभक्तीपर साजरा केला रक्षाबंधन
जि.प.स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राचा उपक्रम
तालुका प्रतिनिधी/१२ ऑगस्ट
काटोल – जि.प.स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यास केंद्र, काटोल येथील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या भावी महिला अधिकाऱ्यांनी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त माजी सैनिक संघटनेच्या माजी सैनिकांना राख्या बांधून ‘संस्कृती व देशप्रेम’ यांचा मिलाप घडवून आणला.
‘देशभक्ती रक्षाबंधन’ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी संतोष सोनटक्के तर प्रमुख अतिथी शिक्षण विस्तार अधिकारी नरेश भोयर, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम जोगेकर, कार्याध्यक्ष रत्नाकर ठाकरे, सचिव अशोक राऊत, ज्येष्ठ माजी सैनिक रामहरी टेकाडे, प्रभाकर महाजन, सुरेश महल्ले, लक्ष्मण कळंबे, संदीप काळे, दत्तराज वरठे, अशोक शेंडे,अशोक मोहोड आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी रत्नाकर ठाकरे म्हणाले की, देशाचे रक्षण करण्याकरिता सैनिक सीमेवर तैनात असतो.भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याच्या ‘रक्षाबंधन’ सणाला तो घरी येऊ शकत नाही.त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता भावी अधिकाऱ्यांनी राबविलेला ‘देशभक्ती रक्षाबंधन’ उपक्रम कौतुकास्पद आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्र समन्वयक राजेंद्र टेकाडे ,संचालन वैष्णवी ठाकरे, तर आभार प्रदर्शन केंद्र समन्वयक एकनाथ खजुरीया यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संगणक ऑपरेटर सतिश बागडे, परिचारिका अनुसया रेवतकर, अपूर्वा पिटटलवार, जास्मिन अंसारी, राधिका लाखे,स्वाती राठोड,उन्नती खजुरीया, यशस्वी चरडे, अश्विनी गाढवे,प्रीती मुरोलीया, कोमल भलावी आदींनी सहकार्य केले.
