

माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांच्यावतीने शिबिराचे आयोजन.
खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्त जीवनदायी आरोग्य विकास फाउंडेशन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर तसेच आरोग्य कार्ड शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन १२ डिसेंबर २०२२ ला माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्या वतीने हिंगणघाट शहरातील सामाजिक उपक्रम राबवून माहेश्वरी भवन गांधी नेहरू वार्ड हिंगणघाट येथे वाढदिवस साजरा करण्यात आला व या शिबिराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून लाभार्थ्यांनी आपल्या शरीराच्या विविध तपासण्या निशुल्क करून घेतल्या.

या शिबिरामध्ये नेत्र तपासणी, दाताची तपासणी, बालरोग तज्ञ (लहान मुलांची तपासणी), कॅन्सर तपासणी व योजनेच्या माध्यमातून निशुल्क शास्त्रक्रिया, हाडाची तपासणी, हार्ट तपासणी,पुरुष व महिलांची तपासणी (जनरल चेकअप) हे सर्व चेकअप करण्यात आले. त्यावेळी जीवनदायी आरोग्य विकास फाउंडेशनचे सदस्य उमेश कडू, राहुल चिंलडूलवार,शुभम पोरे,हिमांशू कृपाल व एच.सी.जी हॉस्पिटल नागपूर तर्फे डॉ. कमलजीत कौर, डॉ.जयश्री शर्मा, मनीष मोहातकर, दुर्गेश भोयर प्रियंका ढवळे व शुअर टेक हॉस्पिटल नागपूर तर्फे डॉ.अनुप पुसाटे, डॉ.उर्मिला डहाके, डॉ.दिव्या मेश्राम, डॉ.कल्याणी गुल्हाने, नागसेन गजभिये,कल्पना पाढढे,प्रेरणा भालशंकर, गोपिका कोवे व हिंगणघाट मधील डॉ. रुपेश लोढा, डॉ.पूनम लोढा, डॉ. सुमेध थुल (लोढा हॉस्पिटल) व धनश्री नेत्रालयाचे डॉ. संजय उस्तवाल व कटारिया हॉस्पिटलचे डॉ. कमलेश कटारिया व नागपूर तर्फे विजन आय हॉस्पिटलचे डॉ. अमर भास्कर या सर्व चमूने तपासणी केली.

तसेच जीवनदायी आरोग्य विकास फाउंडेशनचे आरोग्य परिवाराला कार्ड अनेक लोकांनी बनवून घेतले त्यामध्ये केथ लॅब (फिलिप्स निदरलँड), उदय रोग सर्जरी व बायपास सर्जरी,एन्जिओप्लास्टी, न्यूरोलॉजी न्यूरोसर्जन, गॅस्ट्रोइंट्रोलॉजी, प्लास्टिक सर्जरी/ कॉस्मेटिक सर्जरी, सिटीस्कॅन जॉईंट रिप्लेसमेंट, ॲडव्हान्स लेप्रोस्कोपिक सर्जरी, अर्थोस्कोपी स्त्री रोग व प्रसूती विभाग /फिटल मेडिसिन, नवजात शिशुसाठी विशेष सुविधा, एम.आर.आय टेस्टला, नेफोलॉजी गुर्दा रोग, इंडोकेनॉलॉजी,फिजिओथेरपी, दंत चिकित्सा,नेत्र चिकित्सा, आयसीयू,रेडिओलॉजिस्ट तसेच दवाखान्याच्या बिला वर सूट, औषधी वर सूट,जाच केंद्रावर सूट, चिकित्सा परामर्श वर सूट, मोफत चिकित्सा माहिती ,स्वास्थ शिबिरांची माहिती या सर्व सुविधा आरोग्य कार्ड धारकांना मिळणार आहे. त्यावेळी शिबिराला उपस्थित नगरसेवक सौरभ तिमांडे,समुद्रपूर पंचायत समितीचे माजी उपसभापती पांडुरंग किटे, बालाजी गहलोद,नाजीर अली,गौरव घोडे, अमोल त्रिपाठी, मनोज मुरार, शकील अहमद,प्रशांत लोणकर,धनराज टापरे,नयन निखाडे, पंकज भट, कविता मुंगले, शिवानी सुरकार, पंकज धमणे, युवराज माऊस्कर, सुरज रामटेके,पवन काकडे,रितिक मोघे, लाला जैस्वाल,फैजान सय्यद,हर्षल तपासे, रोशन मोघे,हर्षल बुरीले,आकाश दुर्गे,आदी त्रिवेदी, तेजस बुरीले, वैभव त्रिवेदी,अथरव त्रिवेदी कधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
