किंनवट तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुक मतदान करिता वापरण्यात आलेल्या EVM मशीन मध्ये अफरातफर?

पुन्हा निवडणूक बैलेट पेपर ने घेण्याची गावकर्‍यांनी केली मागणी

सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक 2022 करिता किंनवट तालुक्यातील बर्‍याच ग्रामपंचायत मध्ये दि. 18/12/2022 रोजी मतदान प्रक्रिया EVM मशीन द्वारे पार पडल्या
तालुक्यातील काही उमेदवार यांनी दि. 18/12/2022 रोजी मतदान झाल्यानंतर किती मताने आपण विजयी होणार आहोत हे सांगून विजयी झाल्याची घोषणा केली
पण मतदारानि या कडे पुरेसे लक्ष दिले नाही . मतदानाचा कौल जाणून घेण्यासाठी मतमोजणी तारखेची वाट बघितली ,.दि. 20/12/2022 रोजी मौजे सारखंनी ग्रामपंचायत चा निकाल एक तरफि एकाच पॅनल च्या उमेदवार यांचा विजय झाला असे घोषित झाल्यावर पराभूत झालेल्या उमेदवार यांच्या सह मतदार यांना देखील आश्चर्याचा धक्का बसल्याचे दिसून आले .मौजे सारखंनी येथील मतदान प्रक्रियेत वापरण्यात आलेल्या EVM मशीन वरती शाई चा वापर करून मतदार यांची दिशाभूल करण्यासह मत गणना मशीन मध्ये अफरातफर करून हा विजय मिळविला असल्याचा आरोप मौजे सारखंनी येथील उमेदवार यांनी केला या सह तालुक्यातील बर्‍याच ग्रामपंचायत मध्ये एक तरफि निकाल लागल्याचे मत मतदार आनि उमेदवार यांनी व्यक्त करत EVM मशीन मध्ये अफरातफर झाल्याची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड उप जिल्हाधिकारी कार्यालय किंनवट तहसील कार्यालय किंनवट येथे दिली आहे .सदरील तक्रारीवर चा आढावा घेत कायदेशीर चौकशी करून न्याय मिळवून देण्यात यावे अशी अपेक्षा मतदार आनि उमेदवार करत आहेत