
प्रतिनिधी, प्रवीण जोशी.
ढाणकी.
दिनांक १८ तारखेला ग्रामदैवत असलेल्या हनुमान मंदिर येथे देव संस्कृती विश्वविद्यालय हरिद्वार उत्तराखंड येथून शिक्षण घेत असताना सामाजिक परिविक्षा कालावधी एका महिन्याकरिता गायत्री शक्तीपीठ यवतमाळ येथून ढाणकी शहरात तीन देवकन्या अर्थातच विद्यार्थिनी आल्या असून त्यांनी जीवनातील गायत्री मंत्राचे व योग अभ्यासाचे दैनंदिन जीवनात काय प्राबल्य असते हे सांगितले.
दिनांक १८/१/२०२३ते१९/१/२०२३ या कालावधीत त्यांनी शहरातील विविध ठिकाणी जाऊन या संदर्भात प्रबोधन करणार त्या अनुषंगाने असाच सुयोग ग्रामदैवत असलेल्या हनुमान मंदिरात हा योग जुळून आला. या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी अंधाराकडून प्रकाशाकडे दिशादर्शविणाऱ्या असंख्य दिव्यांनी मंदिराचा भाग प्रज्वलित करून तदनंतर लगेच माता गायत्रीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी अनेक मान्यवर गावातील जेष्ठ व प्रतिष्ठित नागरिकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती तसेच यावेळी ग्रामदैवत असलेल्या हनुमान मंदिरात विविध सुबक अशा मनमोहक रांगोळ्या काढून कार्यक्रमाला अधिकच सुबकता आणली होती. यावेळी आलेल्या या विद्यार्थिनींनी विविध ठिकाणी जाऊन गायत्री मंत्र संदर्भात अनेक चर्चासत्र घेतली व त्यांनी योगाचे व गायत्री यज्ञाचे महत्त्व सुद्धा सांगितले तसेच गायत्री मंत्राची ही परंपरा गेल्या अनेक काळापासूनची असून अनेक ऋषीमुनींनी एकाग्रता व निरोगी राहण्यासाठी याचा उपयोग करून योगसाधना व तपसाधना प्राप्त केली असून तपाचे तेजपुंज कायम ठेवून अखेर मोक्षप्राप्ती केली. तसेच तत्कालीन काळात गायत्री मंत्र हा पुरुषवर्गासाठीच मर्यादित होता पण जागरूक असलेल्या पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांना भविष्यात महिला सुद्धा लहान मुले व इतरांना सुसंस्कृत करू शकतात आणि महिलाही जगातील एक शक्ती असून त्या शक्तीला गायत्री मंत्राची जाण असणे आवश्यक आहे. याची जाण ठेवून महिलांना सुद्धा गायत्री मंत्राची उपासना करण्याचा अधिकार दिला हे विशेष यावेळी आलेल्या विद्यार्थिनींनी शिक्षण हे बीएससी योगा झाले त्यानिमित्ताने शहरातील योग अभ्यास केंद्राला सुद्धा भेट देऊन योग व योगासने यावर आधारित विविध विषयावर मार्गदर्शन केले तर शहरातील आराध्य दैवत असलेले महाका लींका मंदिर येथे सुद्धा चर्चासत्राचे कार्यक्रम प्रयोजन केले होते तसेच या विद्यार्थिनींनी अनेक घरोघरी जाऊन शांतीपाठ व दीप यज्ञाचे महत्त्व सर्वसामान्यांना समजावून सांगितले. या घेण्यात आलेल्या कार्यक्रमामुळे वातावरण मात्र चैतन्यपूर्ण व स्फूर्तीदाई बनले होते.
