न्यू इंग्लिश हायस्कूल , राळेगाव यांची एच . एस. सी बोर्ड परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम


सहसंपादक :- रामभाऊ भोयर

एच .एस. सी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर नुकताच जाहीर झाला असून राळेगाव येथील नामांकित न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय,मधून एच . एस. सी. बोर्ड परीक्षेला एकूण 87 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते.त्यापैकी 77 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकालाची टक्केवारी 88.50% असून शाळेमधून प्रथम क्रमांक कु. स्नेहा राजू अक्कलवार 76.67 टक्के मिळाले असून द्वितीय क्रमांक कु.शितल प्रवीण दरणे 75.67 मिळवून प्राप्त केला असून तृतीय क्रमांक कु दुर्गा पुरुषोत्तम चुनारकर 73.50 % गुण मिळविले आहे एकंदरीत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सुद्धा 12 वी च्या बोर्ड परीक्षा निकालात मुलीनेच बाजी मारली असून शाळेत प्राविण्य श्रेणीत दोन तर प्रथम श्रेणीत 11 विद्यार्थी पास झाले असून द्वितीय श्रेणीत 50 विद्यार्थी पास झाले असून तर तृतीय श्रेणीत 14 विद्यार्थी पास झाले असून शाळेच्या आजूबाजूच्या ग्रामीण भागाचा परिसर पाहता 12 वी बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांनी निकालाची परंपरा यावर्षी सुद्धा कायम ठेवली असून त्यामुळे विध्यार्थीचा या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी पालकाचा कल वाढला असून मागील सत्रात चालत शाळेत चालत असलेल्या सराव परीक्षा,ईतर शालेय उपक्रम यासाठी महत्वाचे आहे. या निकालाचे, न्यू एज्युकेशन सोसायटी संस्थेचे अध्यक्ष बी. के. धर्मे, सचिव सौं.डॉ अर्चना धर्मे तसेच मुख्याध्यापक प्रा. जितेंद्र जवादे, उपमुख्याध्यापक विजय कचरे, पर्यवेक्षक सुरेश कोवे, व प्रा
प्रवीण चौधरी, प्रा. रवी चिकाटे तसेच संस्थेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले असून शाळेतील 12 बोर्ड परीक्षेच्या उत्कृष्ट निकाला बाबतीत समाजातील सर्वच स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.