
सहसंपादक :- रामभाऊ भोयर
भारतीय महिला कुस्तीगीर यांच्या लैंगिक छळ प्रकरणी आरोप असलेले भाजपा खासदार ब्रिजभूषण यांचेवर कार्यवाही करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन राळेगाव तालुका महिला कॉंग्रेस च्या वतीने तहसिलदार राळेगांव यांना देण्यात आले आहे.
लैंगिक छळ प्रकरणात दोषी वर कार्यवाही करणाऱ्या केंद्र सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. यावेळी ज्योत्स्ना भा. राऊत, कविता कुडमेथे, सुनंदा सुरेश, चव्हान, पुष्पा विजय कन्नाके, नलूबाई ना शिवणकर, ज्योत्सना सुनिल डंभारे, सिंधु शंकर शिंदे वंदना डोंगरे, जयश्री मंगेश पिंपरे उपस्थित होत्या.
