वाऱ्हा येथील अंगणवाडी केंद्राला मेघालय राज्यातील ईसीडी टिमची भेट

सहसंपादक : रामभाऊ भोयर

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पंचायत समिती राळेगाव अर्तगत अंगणवाडी केन्द्र वाऱ्हा येथे दि. १३ जुलै २००२३ रोजी मेघालय राज्यातील युनिसेफ टिमने भेट दिली आहे.
विषेश म्हणजे राळेगाव तालुक्यात सुरू असलेल्या अरली चाईल्ड डेव्हलपमेंट ( ECD )हा कार्यक्रम मेघालय राज्यात राबविण्या करीता या प्रकल्पाबाबत माहिती जाणून घेण्यासाठी ही सर्व टिम दिवसभर वाऱ्हा येथे दाखल झाली होती, यामध्ये प्रामुख्याने श्रीमती सि. डी. ल्यांग्वा डायरेक्टर, ल्वाईन शॉप पवनार प्रोग्राम ऑफिसर, सुकलॉग पनभु सल्लागार, डॉ. नितीन आंबाडेकर, डॉ शर्मिला मुखर्जी, सागर विठाळकर बाल विकास प्रकल्प अधिकारी राळेगाव , लताताई घोटेकर सरपंचा, दिपक कळमकर बाल विकास प्रकल्प अधिकारी मारेगांव,डॉ महेश गाधारी, डॉ. अभिषेक राऊत, डॉ राहुल पेठे,निशा पाटील पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका भावना महाजन, आशा चंदा परतेकी, सविता पाझारे आशा गटप्रवर्तक,पाचकवडे आरोग्यआशा विभाग हे प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्व प्रथम अंगणवाडी केन्द्रामध्ये सर्व मान्यंवरांचे स्वागत करण्यात आले, त्यानंतर माता व पालक सभा घेण्यात आली, त्यामध्ये विविध प्रकारचे खेळ, आरोग्य विषयक माहिती, आहार विषयक माहिती, याबाबत माता पालक सभेमध्ये प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. बालकाचा विकास कसा होतो व विकास करण्यासाठी दररोज काय काय करावे लागते याबाबत पालकांनी सांगितले, त्यावर मान्यवरांनी समाधान व्यक्त केले. अंगणवाडी सेविका भावना महाजन यांनी राबविण्यात येत असलेल्या दररोजच्या दैनंदिन सपुर्ण कामकाजाचा आढावा दिला.यावेळी सर्वांनी महत्त्वाचे मुद्दे व माहिती लिहुन सोबत नेली. त्यानंतर गावात गृहभेट फेरी मारून एका स्तनदा मातेच्या घरी भेट देण्यात आली व तिच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी अंगणवाडी सेविका व आशा यांनी गरोदरपणापासुन सांगितलेल्या सर्व बाबी स्तनदा मातेने विषद केल्या. तसेच आहार, स्वच्छता, आरोग्य, वजनवाढ,स्तनपान याबाबत उपस्थितांना मातेने व्यवस्थितपणे माहिती दिली यावर सर्वांनी त्यामातेचे व अंगणवाडी सेविका आशाचे कौतुक केले. त्यानंतर प्रकल्प स्तरावरील अधिकारी सागर विठाळकर बाल विकास प्रकल्प अधिकारी, निशा पाटील, संजिवनी ओंकार, मंजुश्री खसाळे, पाचकवडे आरोग्यआशा विभाग,मोरे सचिव ग्रामपंचायत,यांच्याशी संवाद साधला, माताव पालकांना दिलेल्या सर्व सुचना व माहिती याचा वापर दैनंदिन जीवनात करण्यात येत असल्याचे दिसून आले , एकंदरीत कामकाजाबाबत मान्यवरांनी समाधान व्यक्त केले व आम्ही सुध्दा असाच प्रकल्प मेघालय राज्यात सुद्धा राबविणार असल्याबाबत सांगितले.