
नागपंचमी च्या पावन पर्वावर भद्रावती तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या नागमंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांना फळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
नागपंचमी निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेना भद्रावती भद्रावतीचे आराध्य दैवत नाग मंदिर येथे फळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष उमाशंकर तिवारी , तालुका उपाध्यक्ष महादेवजी वरखडे, शहर अध्यक्ष युगल ठेंगे , अभि उमरे, निखिल उगे, अप्पू मांडवगडे , ओम झोडे, साहिल वालदे , शुभम बावणे, प्रशांत दुबे , साहिल आसकर, ऋषी वरखडे, साहिल तांगडपल्लीवार , पंकज ताजने, प्रथम टिकले , महेश सिडाम आणि इतर मनसैनिक उपस्थित होते.
