
यवतमाळ प्रतीनीधी :- संजय जाधव
महागाव तालुक्यात आजपर्यंत अनेक शिबिरे झाली असतील, परंतू श्रवण तपासणी शिबिर कधी झाले नव्हते ही एकमेव बाब लक्षात घेऊन महेद्रभाऊ मानकर यांनी महागांव शहरात मोफत श्रवण तपासणी शिबिर आयोजित केले होते. “कानाने बहीरा मुकापरी नाही” या गिता प्रमाणे व्यक्तीला ऐकू येत नसेल तर भाषाज्ञान होत नाही अर्थातच तो मुका नसतांनाही काय बोलावे हे त्याला कळत नाही म्हणजे बहीरेपणाच्या आजारावर मुकबधीर आजार मोफत असाच काहीसा निसर्गाचा असमतोल म्हणावा लागेल. असे असले तरी वैद्यकशास्त्राच्या
आजच्या प्रगत तंत्रज्ञानाने कर्णबधिरतेवर पुर्णतः मात करता येते. यासाठी तालुक्यात किंवा अन्यत्र असे श्रवणदोष असलेल्या ऋग्णांसाठी ही सुवर्णसंधी चालून आली होती . दि. ७ नोंव्हेबर सकाळी १० वाजता स्थळ: जि. प. प्रा. मराठी शाळा आठवडी बाजार, महागांव त्याचप्रमाणे दि. ८ नोव्हेबर सकाळी १० वाजता स्थळ : आर्यवैश्य भवन ढाणकी अशा प्रकारे तिन दिवसीय शिबिराचा
कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे संयोजक नितिनभाऊ भुतडा तसेच उदघाटक आ. नामदेवराव ससाने, आ. निलयभाऊ नाईक, नगराध्यक्ष सुरेश जयस्वाल असुन सर्व वयोगटातील कर्णबधिरांनी अधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला, राशनकार्ड, कर्णबधीर दाखला (असल्यास) युआडी कार्ड, तिन पासपोर्ट ई. कागदपत्रे सोबत आणावी. नोंदणी करीता सिध्दार्थ बरडे मो.नं. ९०२१४३६९२९ दिपक आडे मो.नं. ८६०५०२५६८० यांच्याशी संपर्क साधावा व शिबिराचा लाभ घ्यावा असे, रिपाई आठवले प्रणित जिल्हाध्यक्ष महेन्दभाऊ मानकर यांनी आवाहन केले आहे.
