
सहसंपादक : रामभाऊ भोयर
३ जानेवारी २०२४ ला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन वाघाडी येथील पारधी बेड्या वर “आम्ही साऱ्या सावित्री” या मुलींच्या वसतिगृहात आयोजित केला होता. कार्यक्रमांत उपस्थित मा मधुसूदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे मा गोविंद चव्हाण, स्वातंत्र्याच्या शत्रुसंगे, आणि मा उत्तमराव खंदारे जिल्हा संयोजक भारत जोडो अभियान मा कृष्णा जी भोंगाडे, जिल्हा अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती सर्व सामाजिक कार्यात सहभागी असलेले मान्यवर उपस्थित होते.सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा समाजातील वंचित घटकांतील लोकांपर्यंत, कष्टकरी महिला, आणि शाळेत शिकणाऱ्या मुली पर्यंत पोहचला पाहिजे यासाठी जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले जाते ही बाब प्रामुख्याने मा मधुसुदन कोवे गुरुजी यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली “आम्ही साऱ्या सावित्री”या वस्तीगृहात असणाऱ्या मुली या सर्व पारधी समाजातील वंचित घटकांतील आहे आणि हे वस्तीगृह चालवणारी व्यक्ती मा. पपिता मावळे या संस्थेच्या प्रमुख अध्यक्ष आहेत, स्वतः त्यांचा संघर्ष फा मोठा आहे.मोलमजुरी करुन वस्तीगृहातिल मुलींना जगवनं आणि त्यांचं संगोपन करणे, आणि शिक्षणाच्या प्रवाहात कायम टिकून राहणं हा साधा संघर्ष नाही शासनाचे एक रुपया चे अनुदान नाही मग या समुदायात लोकांनी जगायचं कसं या संघर्षातून मार्ग काढण्यासाठी मा.पपिता माळवे प्रयत्न करतं आहे त्याच्या कार्याला आमचा सलाम आहे कार्यक्रमाचे सुत्रसंचलन इशु माळवे यांनी केले.
