
सहसंपादक : रामभाऊ भोयर
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महाराष्ट्रातील जिल्हावार,तालुकावार पदाधिकारी निवड करण्यात येत असून राळेगाव तालुका अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे.राळेगाव तालुक्यातील रावेरी ग्रामपंचायतीचे सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती सोबतच कांग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्षाची यशस्वी धुरा सांभाळत असताना पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन परत एकदा राळेगाव तालुक्याची कांग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाची धुरा राजेंद्र तेलंगे यांच्या हाती सोपवली असून त्यांची परत निवड झाल्यानंतर पक्षाचे काम प्रामाणिकपणे करून पक्ष कसा वाढवायचा यावर विशेष भर देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे .त्यांच्या निवडीचे श्रेय महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री तथा माजी विधानसभा उपाध्यक्ष कांग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक वसंतराव पुरके सर , कांग्रेस पक्षाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अँडव्होकेट प्रफुल्ल मानकर आणि काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष इंजिनिअर अरविंद वाढोणकर यांना देत असून तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
