समावेशित शिक्षण विभाग पंचायत समिती कळंब व R. B. S. K. मिशन अंतर्गत आरोग्य व दिव्यांग तपासणी शिबिर संपन्न

सहसंपादक : रामभाऊ भोयर

समावेशित शिक्षण आणि आर बी एस के टीम यांच्या संयुक्त विद्यमाने बेसिक शाळा कळंब च्या हॉलमध्ये तालुक्यातील अंगणवाडी ते बारावीपर्यंत दिव्यांग विद्यार्थी संदर्भित व उपचार संबंधी निदान शिबिर संपन्न झाले.आर बी एस के टीम व ग्रामीण रुग्णालय मधील तज्ञ यांच्या द्वारे शाळेतील 0 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांची दिव्यांगत्व व आरोग्य तपासणी करण्यात आली व त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हास्तरीय शिबिरामध्ये सहाय्य सेवेकरता संदर्भित करण्यात आले. सदर शिबीरात मार्गदर्शक मा.श्री अमोल सु.वरसे(गटशिक्षणाधिकारी) श्री हेडाऊ साहेब विस्तार अधिकारी श्री मडावी सर (केंद्र प्रमुख)उपस्थित होते तसेच डॉ.श्री अश्विन कोल्हे( तालुका आरोग्य अधिकारी) कु. डॉ.दिघडे मॅडम (तालुका आरोग्य अधिकारी) श्री डॉ.लोणारे (आरोग्य अधिकारी) यांनी उपस्थित राहून विद्यार्थी तपासणी केली.
सदर तालुकास्तरीय आरोग्य उपचार व निदान शिबिरा यशस्वी करण्यासाठी श्री. सचिन पोटुरकर (समावेशित तज्ञ) श्री रतन गोंडे (समावेश तज्ञ )श्री सुजित भगत (विशेष शिक्षक) श्री शंकर आत्राम (विशेष शिक्षक) श्री.विवेक गोंडे (विशेष शिक्षक) यांनी मेहनत घेतली.
कु. प्रगती भाकरे(P.O) कु. छाया भुरकुंडे (A.N.M.) कु. वृंदा टाके (ANM) कु. पायल गजभिये(P.o.) यांचे मोलाचे सहकार्य लाभले..