लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी योग्यरित्या व्हावी याकरिता यवतमाळ जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना दिले निवेदन.

सहसंपादक : रामभाऊ भोयर

महाराष्ट्र राज्य सरकारने जी लाडकी बहीण योजना आणली आहे.त्याची अमंलबजावणीची मुदतवाढ करण्यात यावी तसेच अतिशय सुलभ पद्धतीने आणि पात्र व गरीब घटकातील महिलांना त्यांच्या लाभ मिळावा, तसेच ज्या कागदपत्रांच्या अटी व शर्ती लागु केलेल्या आहे.त्यामध्ये काही प्रमाणात शिस्थिलता असावी कारण महिलांकडे सगळेच कागदपत्रे उपलब्ध नसल्याने बऱ्याच महीला बाहेरगावी पण राहतात दिलेल्या कागदपत्रांची पुर्तता अशक्य आहे.अश्याच कागदपत्रांच्या पुर्ततेसाठी होणाऱ्या त्रासाला कंटाळून दिनांक ३/७/२४ रोजी राळेगाव तालुक्यातील खैरी येथील कलावती लक्ष्मण बुरडकर वय वर्षे ५८ वर्षे या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपवली.असल्याचे आपल्या निर्देशानास असेलच अश्या प्रकारच्या यापुढेही घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे लाडकी बहीण योजना ही माहेरच्या अहेर की बहिणीच्या गळ्यात असलेल्या गळफास समजायला मार्ग उरला नाही.त्यामुळे कृपया प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे ही नम्र विनंती.अश्या मागणीचे निवेदन तहसीलदार राळेगाव मार्फत मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.यावेळी सौ.संध्याताई बोबडे जिल्हाध्यक्ष यवतमाळ जिल्हा महिला काँग्रेस, शालीनीताई रासेकर माजी नगराध्यक्षा वणी,सौ.गायत्रीताई नावाने अध्यक्षा कळंब तालुका,सौ.ज्योती भानुदास राऊत राळेगाव शहर महिला काँग्रेसअध्यक्षा,सौ.पुष्पाताई कोपरकर अध्यक्षा राळेगाव तालुका महिला काँग्रेस , स्वातीताई धवने,सौ.संजिवणी कासार ,किरण सिडाम,बिल.यु.राऊत,राजु पिपंळकर,व राळेगाव तालुक्यातील ईतर काँग्रेस कमिटीच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.