
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
31 डिसेंबर 2025 पर्यंत ekyc न केलेल्या लाभार्थी यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सी मुदतवाढ देण्यात यावी*
राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांना एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय कळंब यांच्या मार्फत राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस कार्याध्यक्ष मनीषा काटे (भोसले)राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष दिलीपराव इंगोले यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांच्या उपस्थितीत निवेदन सादर करण्यात आले..
महाराष्ट्रातील सर्वच महिलांना सुरवातीला लाभ देण्यात आला त्यानंतर ekyc करणे बंधनकारक केले व मुदत 31 डिसेंबर 2025 टेवन्यात आली.. बँक ekyc, आधार सीडीग अनेक समस्यांचा सामना महिलांना ekyc करताना करावा लागत आहेत. सव्ह्रर प्रोब्लेम, तांत्रिक अडचण, csc सेंटरवर गदिॅ , नेटवर्क प्रोब्लेम
त्यामुळे महिला मोठय़ा प्रमाणात ekyc करण्यापासून वंचित राहिलेल्या आहेत.ज्यानी ekyc केली आहेत, त्यांची दुरुस्तीच्या यादीत नावे नाहीत..
31 डिसेंबर 2025 दिलेल्या तारखेत ekyc न केलेल्या महिला
आधार नंबर चुकीचे आहेत, आधार सीडीग प्रॉब्लेम आहेत
असा अनेक लाखो महिला लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहिलेल्या आहेत…
लाडकी बहीण योजनेत ज्या गरजू, परिस्थिती बेताची असलेल्या महिला मोठय़ा प्रमाणात वंचित आहेत..
असा कळंब तालुक्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील समस्त महिलांना मुदतवाढ देऊन दिलासा देण्यात यावा व त्यांचा लाभ त्यांना देण्यात यावा…
अन्यथा आंदोलनाला सामोरे जाऊ असा ईशारा निवेदनाच्या माध्यामातून देण्यात आला..
यावेळी दिलीप इंगोले, सुधाकर निखाडे, विजय पोटे, प्रशांत भोयर, सुषमा पाटील, ओमकार चव्हाण, अरुणा अतकरे, नागोराव किन्हेकर, रंजना ठोंबरे, किरण सूर्यवंशी, शकीला शेख, पपिता पाटील, रुपाली देवाडे, नंदा शिरसागर, लक्ष्मण घोडाम, वैशाली राऊत, वनमाला नेहारे, रंजना उईके, सविता डंभारे, सुनीता थुल, सुमित्रा गेडाम, नंदा पारीसे, सपना करलुके, शांता बावणे, शीतल नागोसे, माधुरी ढोंगे, शीतल भोंडे, मंदा आत्राम, मंगला घोटेकर, काजल पारिसे, सविता गुजर, पपिता मेश्राम, ताई मडावी, उषा रामेकर, जयश्री हजारे, सुलोचना कासार, लता बावणे, गुंफा आसुटकर, सविता खैरकार, ज्योत्स्ना बावणे, सुनीता नागपुरे, राधा सावरकर, पुष्पा कासारकर, अनिता वडे, कांता चव्हाण, नलिनी उईके , भाग्यश्री रोटे, अनु लिलारे, गुंफा उईके, सुनीता मडावी, रंजना वाघमारे, शेकडो महिला लाभार्थी उपस्थित होत्या……
