
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव येथील खरेदी विक्री संघाच्या वतीने नाफेड चना खरेदीचे उद्घाटन आज दिनांक 6/4/2026 रोज सोमवारला दुपारी 12.30 वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाच्या शेडमध्ये करण्यात आले.या खरेदीचे उद्घाटन खरेदी विक्री संघाचे संचालक श्रावणसिंग वडते सर,श्रीधरराव थुटुरकर सर, संचालक पवनसेठ छोरिया त्यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी सर्वप्रथम चना घेऊन येणारे शेतकरी चैतन्य पाल आणि आशिष वरघणे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.त्यावेळी विशाल टापरे सागर वनस्कर राजू जगताप मनोज घोडाम सोबतच संस्थेचे कर्मचारी सचिव संजय जुमडे, लेखापाल गणेश हिवरकर, श्रीराम रामटेके अमृत पाझारे प्रकाश हिवरकर रोशन शिवरकर तसेच मापारी आणि हमाल उपस्थित होते.
