
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राष्ट्रीय आदिवासी स्वायत्त परिषद भारत जिल्हा व तालुका कार्यकारणी अरविंद केराम यांच्या कार्यालय राळेगांव येथे आज दिनांक 09/04/2026रोज गुरुवारला रामचंद्रजी मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्षपदी रजनीकांत परचाके, यांची निवड करण्यात आली.उपाजिल्हा ध्यक्षपदी मनोज पेंदोर, तर सचिव पदी मनोहर कुडमते, यांची निवड करण्यात आली. तालुकाध्यक्षपदी दिलीप किन्नाके, सहध्यक्ष रमेश पेंदाम, कोषाध्यक्ष मधुकर पावले, संघटक रामचंद्र मेश्राम, संपर्क प्रमुख संतोष गेडाम, प्रमुख सल्लागार अंकुश कुमरे, यांची निवड करण्यात आली. या वेळी शंकरराव तोडासे, यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. उपस्थित सदस्य बबनजी चिडाम, नितेश मडावी,गजानन तुमराम, मारोती उईके,हे होते.
