यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
पांढरकवडा . स्थानिक युवा राष्ट्रसंत भय्यूजी महाराज बी एड् महिला महाविद्यालयाचा प्रथम वर्ष प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींचा प्रथम सत्र परीक्षेचा निकाल विद्यापीठाने नुकताच घोषीत केला असून मागील अनेक वर्षापासून सुरू असलेली उत्कृष्ट निकालाची परंपरा यावर्षी देखील कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे प्रशिक्षणार्थी विद्यार्थींनिंचे सर्वत्र कौतुक होत आहे.
महाविद्यालयातून प्रथम क्रमांक मिळविणारी कु. तन्वी खुपाट (79.45) द्वितीय क्रमांक कु. मोनाली डोमडे (78.36) कु. प्रतिक्षा बोबडे (78.36) तर तृतीय क्रमांक कु. पूनम कुळमेथे (78) आणि खुशबू जोशी (78)टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या आहेत. संस्थेच्या अध्यक्षा सौ. बीना अशोक उईके ,,महाविद्यालयाचे संचालक श्याम अरके,, प्राचार्य शेखर खिस्ती, आणि सर्व शिक्षकांनी महिला प्रशिक्षणार्थीनींचे अभिनंदन करून कौतुक केले.
