रामगड येथे महिला शिक्षण दिन साजरा सावित्रीबाई फुले महिला विचारमंच, कोंढाळीचे आयोजन

रामगड येथे महिला शिक्षण दिन साजरा

प्रतिनिधी: ऋषिकेश जवंजाळ

प्रतिनिधी : ४जानेवारी

काटोल -रूढी,परंपरा व अंधश्रद्धेच्या विळख्यात गुरफटलेल्या समाजात शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करून सवित्रीआईने बहुजन समाज व महिलांच्या जीवनात प्रकाश आणला.शिक्षित स्त्रीयामुळे समाजात पुरोगामी विचारांची पेरणी होऊन अन्यायाला वाचा फोडण्याची क्षमता निर्माण झाली.म्हणूनच आधुनिक शिक्षणाची देवता ही सावित्रीआई फुले आहे असे प्रतिपादन शिक्षण अभ्यासक राजेंद्र विमल रामहरी टेकाडे यांनी महिला शिक्षण दिनाच्या कार्यक्रमात रामगड, कोंढाळी येथे केले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विचारमंच, कोंढाळी द्वारा आयोजित ‘महिला शिक्षण दिन’ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ. भा. माळी महासंघ अध्यक्षा कल्पनाताई गोमासे, प्रमुख अतिथी म्हणून पं.स.सदस्य संजय डांगोरे, शिक्षिका स्मिताताई बेलसरे,प्रमुख वक्ते शिक्षण अभ्यास राजेंद्र टेकाडे, संगिता सातपुते, रामराव भेलकर, तुळशीदास फुटाणे,चंद्रकांत बेलसरे,सावता समिती अध्यक्ष ज्ञानेंद्र खेरडे, सचिव प्रमोद बोडखे प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रिती पाचघरे , संचालन दर्शना बोडखे तर आभार प्रदर्शन प्रविणा चिचमलकर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.विजय पाचघरे,दामोदर मानेकर,गुलाब सातपुते, रोशनी मानेकर, सारिका बावनकस, ज्योती पाचघरे, राणी भांगे, मनिषा बोडखे,शिवशंकर चिचमलकर, अभय मानेकर, राहुल पाचघरे यांनी अथक परिश्रम घेतले.