हिमायतनगर तालुक्यात सोमवार पासुन मोफत कोविड लसीकरण* जेष्ठ नागरिकांसह 45 वर्षावरील व्यक्तींना लस

प्रतिनिधी …परमेश्वर सुर्यवंशी

हिमायतनगर तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सोमवार पासून जेष्ठ नागरिक व 45 वर्षावरील व्याधीग्रस्त नागरिकांना मोफत कोविड लस देण्याची सुरुवात होणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एस.पी. पोहरे यांनी दिली आहे.
तालुक्यातील सरसम व चिचोर्डी या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवार पासून कोविडची सुरक्षित लस शासनाच्या आरोग्य विभागामार्फत मोफत देण्यासाठी उपलब्ध होत आहे.
आठवडयातील सोमवार, बुधवार, शुक्रवार या दिवशी सकाळी नऊ ते दुपारी पाच या दरम्यान कोविड लसीकरण करण्यात येणार आहे.
60 वर्षावरील नागरिक व 45 वर्षावरील व्याधीग्रस्त नागरिकांनी कोविड लसचा लाभ घेण्यासाठी प्रथम नोंदणीसाठी पॅनकार्ड किंवा आधार कार्ड सोबत घेऊन येणे अनिवार्य आहे ही लस सर्व संबधिताना मिळणार असुन कोणीही लाभार्थी वंचित राहणार नसल्यामुळे लस घेण्यासाठी गर्दी टाळून गोंधळ होणार नाही , याची काळजी घेणे आवश्यक आहे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एस.पी. पोहरे प्रा.आ. केंद्र चिचोडी येथील डॉ. आंनद जाधव, प्रा.आ. केंद्र सरसम येथील डॉ. वर्षा मोरे , डॉ.पोपुलवार आशा समन्वयक श्री कृष्णा चौधरी , श्री सचिन देशमुख, श्री नाईक यांनी केले.