नाशिक येथील रुग्णालयात मृत पावलेल्याच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखाची मदत:पालकमंत्री छगन भुजबळ,मृतांचा आकडा 22 वर,

नाशिक शहरातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता रुग्णालयावर ताण वाढत आहे.आज दिनांक 21 /04/2021 ला दुपारी 1.30 च्या दरम्यान जाकीर हुसेन रुग्णालयात अचानक oxygen ची टाकी लिक झाली .त्यामुळे रुग्णांची पळापळ सुरू झाली.घटनेची माहिती मिळताच
अग्निशामक दल घटनास्थळी दाखल होऊन गळती थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत.रुग्णालयातील
काही रुग्णांना इतर अनेक ठिकाणी हलवण्याचे प्रयत्न सुरूआहे .या घटनेत 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.